Experience Counts
मी किरण आपटे. मला ट्रेक, किल्ले भटकंतीची फार आवड. मी स्व:त काही ट्रेक्स घेऊन गेलो आहे. 2014 साली मी दुर्ग ढाकोबा पहाण्यासाठी पाच जण घेऊन गेलो. एक गावकरी गाईड म्हणून घेतला. अवघड खुंटीच्या वाटेने आम्ही दुर्ग तर केला, तिथून ढाकोबाला जायला संध्याकाळ झाली. अर्थातच वरील गावात मुक्काम केला. सकाळी फक्त पाणी घेऊन गाव सोडले. गाईडला लवकर जाण्यासाठी वरची वाट दाखवायला सांगितली. आम्ही गणपति गडद च्यावर पोहचलो आणी गाईडला वाट सापडेना. संपुर्ण दगडी भिंत उतारता येत नाही. दुपारचे दोन वाजले. पाणी पण संपायला आले. एका ठिकाणी वाट त्याने सोडली होती. माझ्या अनुभवावरुन त्याला त्याच वाटेवर परत न्यायला सांगितले. कशेतरी घसरगुंडी करीत 15 /18फुट खाली आलो. आणी वाट मिळाली. फक्त वाट दगडाला वळसा घालून जात होती. ती दिसली नाही, पण आमचे धाबे दणाणले होते. मी जबाबदार असल्याने माझी तर वाट लागली होती. जंगलात रोजच्या माणसाला पण चकवा लागतोच.